पंकजा मुंडेना विधानपरिषद उमेदवारी नाकारल्याने समर्थक नाराज, आत्महत्येचा प्रयत्न

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावळून भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत खापरे यांना उमेदवारी देण्यात आली. 

Updated: Jun 9, 2022, 06:38 PM IST
पंकजा मुंडेना विधानपरिषद उमेदवारी नाकारल्याने समर्थक नाराज, आत्महत्येचा प्रयत्न title=

अहमदनगर :  राज्यसभा निवडणुकीचा घोडेबाजार सुरु असताना राज्यात दुसऱ्या बाजूला विधानपरिषेदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावळून भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत खापरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पंकजा मुंडे सर्मथकांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. अशाच एका नाराज कार्यकर्त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. 
अहमदनगरमधील पाथर्डी येथील मुंडे यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (bjp not given legislative council candidate to pankaja munde supporter attempt suicide angry over)

"पंकजा यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जाते आहे. भारतीय जनता पक्षाकडून पंकजा यांच्या सारख एक मोठं नेतृत्व संपवण्याचा आणि सातत्याने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रकारावर कुठे दाद देखील मागता येत नाही यामुळे आपण व्यथित झालो असून आता जीवन संपवण्याशिवाय पर्याय नाही", असं म्हणत गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आत्महत्या करण्यापासून वेळीच रोखल्याने पुढचा अनर्थ टळला. गर्जे यांना पाथर्डीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.