सर्वात मोठी बातमी! BMC निवडणुकीआधी शिंदे गटाकडूनच 'भाजप'ला मोठा धक्का

मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटाचा भाजपलाच मोठा धक्का 

Bollywood Life | Updated: Sep 18, 2022, 08:26 PM IST
सर्वात मोठी बातमी!  BMC निवडणुकीआधी शिंदे गटाकडूनच 'भाजप'ला मोठा धक्का  title=

BMC Election 2022 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Brihanmumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जागांवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजप (BJP) 'मिशन मुंबई'साठी राज ठाकरेंच्या मनसेला (MNS) सोबत घेणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेकडून (Shivsena) महापालिका भाजपला आपल्या ताब्यात घ्यायची आहे. मात्र सत्तेत एकत्र असलेल्या शिंदे गटातील मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी भाजपलाच मोठा धक्का दिला आहे. 

मागाठाणेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे (MLA Prakash Surve) यांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिंदे गटामध्ये सामील केलं आहे. भाजपच्या माजी वॉर्ड अध्यक्षा प्रीती इंगळे (preeti Ingale) यांच्यासह 100 महिलांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीआधी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेमधून बाहेर पडत भाजपसोबत जात राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन केलं होतं. 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र महाविकास आघाडीला घरी बसवत एकत्र आलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये या फोडाफोडीच्या राजकारणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळे शिवसेनेला मोठं भगदाड पडलं होतं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्ष वाढीसोबत मुंबई महापालिकेत सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे.