नागरिकांनो पाणी जपून वापरा! मुंबईत १९ आणि २० सप्टेंबरला काही भागात पाणीपुरवठा बंद

BMC Announces Water Cut In Mumbai: मुंबईतील काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेने तशा सूचना दिल्या आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 17, 2024, 06:47 AM IST
नागरिकांनो पाणी जपून वापरा! मुंबईत १९ आणि २० सप्टेंबरला काही भागात पाणीपुरवठा बंद  title=
BMC Announces Water cut In Parts Of K East-West Wards For Maintenance On Sept 19 20

BMC Announces Water Cut In Mumbai: मुंबईकरांवर दोन दिवस पाणी कपातीचे संकट आहे. मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-2 येथे 750 मिलीमीटर व्यासाच्या चार झडपा बदलण्यात येणार आहे. यामुळं दिनांक 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 पर्यंत मुंबईतीली के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद असणार आहे, असं पालिकेकडून कळवण्यात आलं आहे. 

पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा तसंच, पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असं अवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. आऊटलेट दुरुस्ती कामानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असंही महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलं आहे.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद असणार?

के पूर्व - महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व - सुंदर नगर, गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व - त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाऊंड, सारीपूत नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व – दुर्गानगर, मातोश्री क्लब (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पश्चिम- सी.डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्केट, भर्डावाडी, नवरंग सिनेमाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे गार्डन पंप व गझदर पंप, गिल्बर्ट हिलचा काही भाग, तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.