निरोपाची वेळ जवळ आली! गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त

गणपती विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांसह मनपा कर्मचारी सज्ज.. सुरक्षेसाठी 20 हजार पोलिसांचा फौजफाटा... विसर्जन मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल... करण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 16, 2024, 11:21 PM IST
निरोपाची वेळ जवळ आली! गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त title=

Ganesh Visarjan 2024 : दहा दिवसांच्या सेवेनंतर बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ आली आहे. अनंत चतुर्थीला दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त पहायला मिळत आहे. गणेश विसर्जनसाठी प्रशासनाने देखील चोख तयारी केली आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.  

गणेश विसर्जनसाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झालीय. शांततेत विसर्जन होण्यासाठी जवळपास 12 हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज झालेत. गणरायाचं विसर्जन सुलभ आणि शांततेत व्हावे यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलीय. नियंत्रण कक्ष, नैसर्गिक आणि  204 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेत.

पुण्यात  12, 500 पोलिस तैनात

पुण्यात गणेश विसर्जन सोहळ्यासाठी साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणारेय.  विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे.  लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गांवरून गणेश विसर्जन मिरवणूक जाणारेय...मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची मिरवणूक उद्या दुपारी 4 वाजता निघणार आहे. उमांगमलज रथामधून गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. यासाठी जटोली शिवमंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. तसंच या रथाला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. या रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरुही असेल. तर कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखवण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर तो तोललेला असून, बाजूला 21 छोटे कळस लावण्यात आलेत. तर रथावर 23 नंदींचे चेहरे बसवले आहेत. तसंच रथावर तब्बल 18 क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येतील. दगडूशेठ गणेशोत्सवाचं यंदा 132वं वर्ष आहे. 

नाशिकमध्ये  लेजर लाईट आणि डीजेला बंदी

नाशिकमध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक  मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त मिरवणूक मार्गावर बघायला मिळणारे.. मिरवणूकमध्ये लेजर लाईट देखील न लावण्याच्या सूचना गणेश मंडळांना सूचना देण्यात आल्या आहे.. गणपती विसर्जन मिरवणुकीत कर्कश डीजे लावल्यास आणि लेझर लाईट वापरल्यास कडक कारवाईचा इशारा अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. या नियमांचं उल्लंघन केलं तर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.