BMC Job: मुंबई पालिकेत दहावी उत्तीर्णांना नोकरी, 25 हजारपर्यंत मिळेल पगार; मराठी येणाऱ्यांना प्राधान्य

BMC Recruitment: 14 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर, चुकीच्या पद्धतीने पाठवलेले आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Updated: Jul 22, 2023, 10:29 AM IST
BMC Job: मुंबई पालिकेत दहावी उत्तीर्णांना नोकरी, 25 हजारपर्यंत मिळेल पगार; मराठी येणाऱ्यांना प्राधान्य title=

BMC Job: दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी दहावी ते पदवीधर अशा सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पदभरती अंतर्गत एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात ज्युनिअर लायब्रेरियनचे 1, ज्युनिअर डायटेशियनच्या 3, ऑप्टोमेट्रिस्टचे 1 आणि ऑडिओलॉजिस्टची 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

ज्युनिअर लायब्ररियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मुंबई विद्यापीठ किंवा तत्सम मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्समधील पदवी किंवा पदविकाधारक असणे आवश्यक आहे.  लायब्ररियन पदाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. 

ज्युनिअर डायटेशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून होम सायन्समधील पदवी पूर्ण केलेली असावी. किंवा डायटिक्स, न्युट्रीशन मधील पदव्युत्तर पदविका असणे गरजेचे आहे. पदाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. 

ऑप्टोमेट्रिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराने ऑप्टोमेट्रीमधील 3 वर्षांची पदवी पूर्ण केलेली असावा.
किंवा बारावी आणि बीएस्सी ऑप्टोमेट्रीमधील पदवी पूर्ण केलेली असावी.

ऑडिओलॉजिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रलिया किंवा कॅनडा येथील मान्यताप्राप्त संस्थेतून ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमधील पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.  मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये 5 वर्षे इतकी सवलत देण्यात येणार आहे. उमेदवारांना 291 आणि जीएसटी इतके परीक्षा शुल्क भरावे लागेल. 

पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी मिळू शकणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज खोली क्र. 15, तळ मजला, रोख विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, कॉलेज बिल्डिंग येथे पाठवायचे आहेत. 

14 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर, चुकीच्या पद्धतीने पाठवलेले आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.