पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीत बोगस मतदान झाल्याची तक्रार

पुणे जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. असं असताना काही ठिकाणी बोगस मतदान नोंदणी झाल्याच्या तक्रारी आहेत. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 26, 2018, 09:03 PM IST
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीत बोगस मतदान झाल्याची तक्रार  title=

पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. असं असताना काही ठिकाणी बोगस मतदान नोंदणी झाल्याच्या तक्रारी आहेत. 

कुठे झालाय गोंधळ?

मुळशी तालुक्यातील संभवे ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत गावात राहत नसलेल्या परप्रांतीय मतदारांची नावं घुसडण्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. यासंदर्भात तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करूनही काही उपयोग झालेला नाही. मतदार यादीमध्ये बोगस नावं नोंदली गेली असल्याचा अहवाल तलाठ्यानं तहसीलदारांकडे सादर केलाय. 

काहीच कारवाई नाही...

तरीदेखील काहीच कारवाई झालेली नाहीये. या प्रकारामुळे गावातील वातावरण खराब होणार असून निवडणुकीला गालबोट लागण्याची शक्यता तक्रारदार ग्रामस्थांनी वर्तवली आहे. या पार्शवभूमीवर मतदार यादीतील बोगस नावं कमी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी मागणी त्यांनी केलीय. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी या विषयावर बोलण्यास असमर्थता दर्शवली.