नवी मुंबई : उरण तालुक्यातील सोनारी गावात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडी खेळून तलावात अंघोळीसाठी गेलेला १७ वर्षीय तरुण बुडाला. महेश फड असे त्याचे नाव आहे. ही घटना न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
बारावीत शिकणारा महेश तलावात उतरला. त्याने तलाव पोहोत पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न जीवावर बेतला. त्याला तलाव पोहोत पार करता आला नाही. पोहोतना त्याची दमछाक झाली आणि तो तलावात बुडाला.
तलाव खोल असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. उशिरा त्याचा मृतदेह काढण्यात आला आहे. शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.