अहमदनगर : एकीकडे समाजातील भेदभावाची दरी दूर होऊन एकत्र समाज निर्माण व्हावा म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहान देत असताना दुसरीकडे मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या काका आणि मामाने दोघांवरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर येथे घडली आहे. या घटनेत गंभीरपणे भाजलेल्या आणि दुखापत झालेल्या मुलीचा दुर्दैवी मूत्यृ झाला आहे.
मुलावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पारनेर तालूक्यातील निघोज येथे ही घटना घडली आहे. रुख्मिणी रणसिंग असं त्या पीडित तरुणीचे नाव आहे आणि मंगेश रणसिंग असं त्या मुलाचे नाव आहे.
रुख्मिणीच्या घरच्यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. रुख्मिणी माहेरी आली होती. तिला न्यायला मंगशे रणसिंग तिच्या घरी गेले असता रुख्मिणीच्या घरच्यांनी दोघांना मारहाण केली. या दोघांचा ६ महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. हा विवाह रुक्मिणीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता.
रागात असलेल्या रुक्मिणीच्या कुटुंबीयांनी रुक्मिणीच्या आणि मंगेशच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलेया प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या काका आणि मामाला अटक करण्यात आली असून मुलीचे वडील मात्र फरार आहेत.