पुण्याच्या कात्रज घाटात वणवा; वणवा विझविण्यासाठी अभिनेत्याची धाव

घाटातील डोंगर परिसरात आग लागली होती.

Updated: Mar 8, 2020, 08:12 PM IST
पुण्याच्या कात्रज घाटात वणवा; वणवा विझविण्यासाठी अभिनेत्याची धाव

पुणे : पुण्याच्या कात्रज घाटात वणवा लागल्याची घटना घडली आहे. वणवा विझविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी धाव घेतली. कात्रज घाटातून प्रवास करताना वणवा लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेत आग विझवली. त्यांच्यासोबत, त्यांचे मित्र नगरसेवक राजाभाऊ बराटे आणि इतर चार पाच मित्र होते. घाटातील डोंगर परिसरात ही आग लागली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.