CBSE Board Exam 2023: केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा आजपासून (15 फेब्रुवारी) सुरूवात होत आहे. यावर्षी 38 लाख 83 हजार 710 विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत. अशातच परीक्षा केंद्रावर विद्यार्थांचा गोंधळ होऊ नये म्हणून बोर्डाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान सीबीएसईकडून इयत्ता दहावीची परीक्षा 76 विषयांसाठी घेतली जाईल आणि इयत्ता बारावीची परीक्षा एकूण 115 विषयांसाठी घेतली जाईल. दहावीसाठी 7240 परीक्षा केंद्रे तर बारावीच्या परीक्षेसाठी 6759 केंद्रांचे नियोजन करण्यात आलं आहे. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार यंदा 38 लाखांहून अधिक विद्यार्थी सीबीएसई बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थी दहावीची तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षांसाठी देशात आणि परदेशात 7 हजार 250 हून अधिक परीक्षा केंद्रे स्थापन केली आहेत. 10वीची परीक्षा 16 दिवसांत संपणार आहे तर बारावीच्या परीक्षेला 36 दिवस लागतील. शेवटचा पेपर ५ एप्रिल रोजी असणार आहे.
वाचा: कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू