कुख्यात चड्डी-बनियन गँगला अटक

राज्यभरात १५० पेक्षा अधिक ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या चड्डी बनियन गँगला कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Jul 14, 2017, 06:51 PM IST
कुख्यात चड्डी-बनियन गँगला अटक title=

कोल्हापूर : राज्यभरात १५० पेक्षा अधिक ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या चड्डी बनियन गँगला कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीय. 

या गँगकडून कोल्हापूर जिल्ह्यातल्या ६० घरफोड्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शोध पथकांच्या पोलिसांना यश आलंय. या टोळीकडून सोन्या - चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि फॉरेन करन्सीसह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. 

उस्मानाबाद जिल्ह्यातून या टोळीतील चार जणांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीय. यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x