ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचा मोठा निर्णय, 'त्या' घटनेनंतर पर्यटक जिप्सींना नवे नियम लागू

ताडोबा व्यवस्थापनाने सर्वप्रथम दहा वाहन चालक आणि मार्गदर्शकांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच प्रत्येक वाहनधारकावर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

Updated: May 29, 2024, 12:51 PM IST
ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचा मोठा निर्णय, 'त्या' घटनेनंतर पर्यटक जिप्सींना नवे नियम लागू title=

Chandrapur Tadoba Andhari Tiger Reserve New Rule : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात ‘टी 114’ या वाघिणीची वाट रोखून धरणाऱ्या जिप्सी चालक आणि गाईड्सवर कारवाई करण्यात आली आहे. यात आतापर्यंत 25 पेक्षा जास्त चालक आणि गाईस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 

प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या पर्यटक जिप्सींना यु-टर्न मारण्यासाठीही प्रतिबंध करण्यात आला आहे. टी 114 वाघिणीला घेराव घालून तिची वाट रोखणाऱ्या अनेक जिप्सी चालकांचे पर्यटन करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी 10 जिप्सी गाईड आणि चालक यांना पर्यटन साखळीतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने बैठक घेत याबाबतचा नवा नियम लागू केला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

शनिवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक, जिप्सी वाहन चालक आणि गाईड यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये ‘टी ११४’ वाघीण रस्त्यावर आली असता वाहनचालकांनी तिची वाट रोखून धरली. यामुळे ती वाघीण पर्यटक आणि वाहनांच्या गर्दीत पूर्णपणे अडकली.  या प्रकारामुळे ताडोबातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. वन्यप्रेमींकडून याबाबत संताप व्यक्त होताच ताडोबा व्यवस्थापनाने सर्वप्रथम दहा वाहन चालक आणि मार्गदर्शकांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच प्रत्येक वाहनधारकावर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी नवा नियम

या प्रकरणानंतर चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच गेल्या वर्षभराच्या काळात ज्या पर्यटक जिप्सी आणि गाईड यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, अशा विविध 15 प्रकरणांमध्ये वेगळी स्वतंत्र कारवाई केली गेली आहे. या 15 जिप्सी आणि गाईड यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. यामुळे 48 तासात एकूण कारवाईची संख्या 25 वर पोहोचली आहे. ताडोबात वाघ बघण्यासाठी पर्यटक, जिप्सी चालक आणि गाईड यांच्यावर आणत असलेला दबाव लक्षात घेता त्यांना शिस्त लावण्यासाठी हा धडक निर्णय घेण्यात आला