चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या संध्या गुरनुले

चंद्रपूर  जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या संध्या गुरनुले यांचा विजय झाला आहे.  

Updated: Jan 4, 2020, 05:27 PM IST
चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या संध्या गुरनुले title=

चंद्रपूर : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या संध्या गुरनुले यांचा विजय झाला आहे. ३६ विरूध्द २० मतांनी काँग्रेस उमेदवार वैशाली शेरकी यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपच्या रेखा कारेकार विजयी झाल्या असून ३६ विरूध्द २० मतांनी काँग्रेसच्या खेमराज मरसकोल्हे यांचा पराभव केला. जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडे पूर्ण बहुमत आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. ज्येष्ठ सदस्य संध्या गुरनुले अध्यक्ष, तर रेखा कारेकर या उपाध्यक्षपदी निवडून आल्या. ५६ सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३६ एवढे संख्याबळ आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवडणूक एकतर्फी होण्यासाठी काळजी घेतली. 

नतुन अध्यक्ष संध्या गुरनुले या दुसऱ्यांदा या पदावर विराजमान झाल्या. यावेळी हे पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होते. विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुधीर मुनगंटीवार यांनीही जिल्हा परिषदेत जाऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून जनसेवेचे आश्वासन दिले. नव्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांनीही, पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.