वाशीतील सेंट मेरी शाळेत खळबळ; शौचालयात आढळला सहावीतील मुलीचा मृतदेह

Minor Girl DeadBody Found In School Vashi: वाशीयेथील सेंट मेरी शाळेत मोठी खळबळ उडाली आहे. शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 16, 2023, 11:31 AM IST
वाशीतील सेंट मेरी शाळेत खळबळ; शौचालयात आढळला सहावीतील मुलीचा मृतदेह title=
Class 6th student found dead in schools toilet in vashi

स्वाती नाईक, झी मीडिया

Minor Girl DeadBody Found In School: सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेतच (School) मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाशीयेथील (Vashi) सेंट मेरी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांकडून (Police) या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. मुग्धा महेंद्र कदम असं मयत मुलीचे नाव असून ती कोपरखैरणे येथे कुटुंबासह राहते. 

वाशीमधील सेंट मेरी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी शाळेतील शौचालयात मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. शौचालय साफ करणारी महिला साफ- सफाईसाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनीचा मृत्यू कशामुळं झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. मात्र, शौचालयात मृतदेह आढळल्याने शाळेतील मुलांमध्ये भीती पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी आजारी होती. त्याचदरम्यान आजारपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून वाशी पोलिसांकडुन या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. 

शौचालयात आढळला मृतदेह

मधल्या सुट्टी दरम्यान मुग्धा शौचालयात गेली होती. मात्र वर्ग पूर्ण भरल्यावरतीही विद्यार्थिनी वर्गात आली नाही. तिच्या वर्गमित्रांनी ही बाब शिक्षकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी शाळेत शोधाशोध सुरू केली. मात्र ती शाळेच्या परिसरात कुठेच सापडली नाही. याच शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेला शौचालयात साफ- सफाईसाठी गेलेल्या महिलेला एक दरवाजा बंद आढळून आला. दरवाजावर थाप मारुनही आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा तिने तातडीने शाळेतील शिक्षकांना ही माहिती दिली. दरवाजा तोडल्यानंतर मुग्धा शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळली. तेव्हा तातडीने शाळा प्रशासनाला याबाबत माहिती दिली. 

डॉक्टरांनी केले मृत घोषित

शाळा प्रशासनाने विद्यार्थिनीला मनपा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.