महाराष्ट्रात ३३ उमेदवारांविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

विधानसभा निवडणुकीसाठी ३ हजार २३७ उमेदवार रिंगणात आहेत

Updated: Oct 20, 2019, 12:14 PM IST
महाराष्ट्रात ३३ उमेदवारांविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी ३ हजार २३७ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ३३ उमेदवारांविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून या गुन्ह्यांची चौकशी सुरु आहे. तर प्रचारा दरम्यान १ हजार ७८० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ९७५ गुन्हे हे अनधिकृत हत्यार बाळगल्याप्रकरणी नोंदवण्यात आहेत. तर जवळपास १४३ कोटी रुपये कॅश जप्त करण्यात आली असून जवळपास २२ कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. 

या खेरीज जवळपास २१ कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि २५ कोटी रुपायंचे सोने-चांदी जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय प्रचारा दरम्यान पैसे वाटप आणि अधिकृत वेळेव्यक्तिरिक्त प्रचार करण्यात आल्याचे गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान मतदान प्रक्रियेसाठी संपूर्ण राज्यभर ६ लाख ५० हजार अधिकारी आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील २हजार ७७८ मतदानकेंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. तर मुंबईमध्ये ४० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.