एलईडी मासेमारीवरून कोकण विरूद्ध गोवा संघर्ष

एलईडी मासेमारीवरून कोकण विरूद्ध गोवा असा संघर्ष उभा ठाकल्याचं पहायला मिळत आहे. या संघर्षात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे हा संघर्ष आता कोणकातील अंतर्गत राजकारणाचाही विषय ठरल्याचं पहायला मिळत आहे.

Updated: Feb 19, 2018, 11:56 AM IST
एलईडी मासेमारीवरून कोकण विरूद्ध गोवा संघर्ष title=

सिंधुदुर्ग :एलईडी मासेमारीवरून कोकण विरूद्ध गोवा असा संघर्ष उभा ठाकल्याचं पहायला मिळत आहे. या संघर्षात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे हा संघर्ष आता कोणकातील अंतर्गत राजकारणाचाही विषय ठरल्याचं पहायला मिळत आहे.

कोकण किणारपट्टीत एलईडी बल्बचा वापर करून मासेमारी करणाऱ्या तीन बोटी आढळल्या होत्या. या बोटींचे माल गोव्यातील असल्याचे समजते आहे. अशा प्रकारच्या मासेमारीला कोकणवासीयांचा विरोध आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग विरुद्ध गोवा असं चित्र निर्माण झालं आहे.

दरम्यान, या संघर्षाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार निलेश राणे मासेमारांची बाजु घेताना दिसतायत. गेल्या निवडणुकीत राणेंच्या मासेमारांबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना फटका बसला होता. त्यामुऴेच आता मासेमारांती सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं दिसतंय.