अहमदनगर : वांद्रे येथे नुकत्याच झालेल्या भाजपा मेळाव्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. २०१९ च्या निवडणुकीतही भाजपाचा झेंडा उंचावणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. पण वारे आता उलट्या दिशने वाहू लागल्याचे चित्र आहे. कारण अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवलाय.यात काँग्रेसचे उमेदवार विशाल कोतकर साढे चारशे मतांनी वजयी झाले आहे. तर भाजपाचे उमेदवार महेश सोले यांची अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे.
अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपामध्ये चुरस पाहायला मिळण्याची अपेक्षा होती. पण कॉंग्रेस उमेदवार विशाल कोतकर साढे यांनी भाजपाचे उमेद्वार महेश सोले यांना दणदणीत मात दिली. या पोटनिवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. ही पोटनिवडणुक एका जागेसाठी असली, तरी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांना एका प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली होती.