कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, दहावी परीक्षेतही पेपर फुटले

 कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळते आहे. कारण बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही पेपर फुटल्याचे समोर आले आहे. 

Updated: Mar 9, 2019, 11:35 PM IST
कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, दहावी परीक्षेतही पेपर फुटले title=
संग्रहित छाया

बुलडाणा : कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळतंय. कारण बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही पेपर फुटल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अर्ध्या तासातच प्रश्नपत्रिकेतले प्रश्न परीक्षा केंद्रातून बाहेर आल्याचा प्रकार मोताळा इथल्या बबनराव देशपांडे विद्यालयात घडला आहे. दहावीच्या हिंदीच्या पेपरच्या वेळी अर्ध्या तासातच प्रश्नपत्रिकेतले प्रश्न परीक्षा केंद्राबाहेर आले. केंद्राबाहेर आलेल्या प्रश्नांची प्रत स्थानिक झेरॉक्स दुकानातून प्रत्येकी दहा रुपयांत विकली जात आहे. 

या माध्यमातून प्रश्नाचे उत्तर परीक्षार्थींना कॉपीच्या माध्यमातून पुरवण्यात आल्याचे पाहायला मिळालं. या सगळ्या प्रकारावर जिल्ह्याचे परीक्षा नियंत्रक आणि माध्यमिक शिक्षकाधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. त्यावेळी या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो का हे पाहतो असं अजब आणि बेजबाबदारपणाचे उत्तर त्यांनी दिलंय. आर्थिक हितसंबंध असल्यामुळे या प्रकरणाकडे शिक्षणाधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.