अन्यथा व्हॉट्सएप ग्रुप एडमीनवर कारवाई, पोलीस महानिरिक्षकांचा इशारा

चुकीची अथवा गैरसमज टाकणारी माहिती टाकली तर एडमीन देखील जबाबदार 

Updated: Apr 9, 2020, 11:16 PM IST
अन्यथा व्हॉट्सएप ग्रुप एडमीनवर कारवाई, पोलीस महानिरिक्षकांचा इशारा

मुंबई : कोरोनाच्या संकटासोबतच अफवांच पेव सध्या जोरात आलंय. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊलं उचलली आहेत. महाराष्ट्र सायबरचे पोलीस महानिरिक्षक हरिश बैजल यांनी व्हॉट्सएप ग्रुप एडमीनसाठी काही सुचना दिल्या आहेत. 

व्हॉट्सएप ग्रुपमध्ये कोणत्याही सदस्याने चुकीची अथवा गैरसमज टाकणारी माहिती टाकली तर एडमीन देखील जबाबदार असेल. त्यामुळे ग्रुप एडमीनने व्हॉट्सअप ग्रुपवर जाऊन ओन्ली एडमीन अशी सेटींग करा..त्यामुळे तुमच्यावर कारवाईची वेळ येणार नाही अशी सूचना हरिश बैजल यांनी दिली आहे. 

सोशल मीडियावर खोट्या बातम्या, अफवा, चुकीची माहिती व द्वेषयुक्त भाषण कोणी पसरवित असल्यास आणि आपणास कोणत्याही अशा अफवा, ऑडिओ / व्हिडिओ क्लिप्स आढळल्यास @MahaCyber1 ला ट्वीट करावी असे निर्देश महाराष्ट्र सायबर सेलतर्फे देण्यात आले आहेत.

अशा त्रास देणाऱ्यांवर आणि समाजकंटकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. आपण http://cybercrime.gov.in वर सायबरगुन्हे बाबत माहिती नोंदवू शकता. तसेच जवळच्या पोलिस स्टेशनला तात्काळ कळवण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनाने केले आहे.