पुण्यात कोरोनाचा उद्रेक, कोरोनाबाधितांना मिळेना बेड !

राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  पुण्यात (Pune) स्थिती भयंकर झाली आहे. (Coronavirus outbreak in Pune) कोरोनाबाधितांना बेड मिळत नसल्याचीबाब पुढे आली आहे. 

Updated: Mar 16, 2021, 10:16 AM IST
पुण्यात कोरोनाचा उद्रेक, कोरोनाबाधितांना मिळेना बेड !
संग्रहित छाया

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही शहरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आता पुण्यात (Pune) स्थिती भयंकर झाली आहे. (Coronavirus outbreak in Pune) कोरोनाबाधितांना बेड मिळत नसल्याचीबाब पुढे आली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना खाली बेड शोधण्यात दमछाक होताना दिसत आहे.

पुण्यात सोमवारी दिवसभरात 1 हजार 82 नवीन करोनाबाधित सापडले आहेत. 10 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 78 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 19 हजार 285 झाली आहे. आजपर्यंत 4 हजार 962 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढ असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहे. तरीही काही ठिकाणी लोकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेतल्याने स्थिती नाजूक होताना दिसून येत आहे.

कोरोनाबाधित एका वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करायचे होते. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने खाली बेड मिळणे अवघड झाले आहे. 68 वर्षीय काकांना कोरोना झाला. त्यांना आधीच मधुमेह होता. त्यातच त्यांना उच्च रक्कदाबाचा विकार, यामुळे त्यांची स्थिती नाजूक झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करायचे होते. मात्र, बेड खाली नसल्याने त्यांच्या नातेवाइकांना बेडची शोधाशोध घेताना दमछाक झाली.

या काकांना बेड काही मिळाला नाही. त्यांना अखेर ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील पाच वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांशी या काकांच्या नातेवाइकांनी संपर्क साधला. मात्र, नाव नोंदवून घेण्यापलीकडे काही रुग्णालयाने कोणतीही हालचाल केली नाही. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुमच्या पुढे 27 नंबर असल्याचे उत्तर एका खासगी रुग्णालयातून देण्यात आले. 42 तासानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, पुणे शहरातील 85 टक्के रुग्णांना कोरोना विषाणूची कोणतीही स्पष्ट लक्षणे नाहीत. मात्र, संक्रमित झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना झाला. त्यामुळे त्यांना घरातच विलगिकरण होण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांना आणि आजारी असलेल्या 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावे लागते. तर, उर्वरित 5 टक्के रुग्णांना उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करणे आवश्यक असते. यासाठी रुग्णालयांत पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध करण्यात आले आहेत, असा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. असे जरी पालिका प्रशानस सांगत असले तरी शहरात चित्र वेगळेच आहे.