देशी कट्टा घेऊन वहिणीसमोर करत होता शायनिंग, चुकून गोळी सुटली आणि...

मस्करी पडली भलतीच महागात, शिर्डीतली धक्कादायक घटना

Updated: Jul 7, 2022, 04:54 PM IST
देशी कट्टा घेऊन वहिणीसमोर करत होता शायनिंग, चुकून गोळी सुटली आणि...

कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : देशी कट्टा घेऊन वहिणीसमोर शायनिंग करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. कट्ट्यातून चुकून गोळी सुटली आणि समोर उभ्या असलेल्या वहिणीचा नाहक जीव गेला. शिर्डीतल्या कोपरगाव इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनीता भालेराव असं मृत महिलेचं नाव आहे.

कोपरगावमधल्या पोहेगाव इथं दुपारी 11 च्या सुमारास ही घटना घडली. विशाल भालेराव याने विनापरवाना गावठी कट्टा आणला होता. घरात त्याने वहिणीला देशा कट्टा दाखवला आणि तिच्यासमोर शायनिंग मारु लागला. पण ही मस्करी त्याला भलतीच महागात पडली. कट्टा दाखवण्याच्या नादात विशालकडून कट्टयाचा खटका ओडला गेला.

कट्ट्यातून सुटलेली गोळी समोर उभ्या असलेल्या सुनीता भालेराव यांच्या डोक्यातून थेट आरपार गेली. सुनीता जागेवरच रक्तबंबाळ होऊन पडल्या. समोर दृश्य पाहून विशाल घाबरला आणि तिथून तो फरार झाला. आजूबाजूच्या लोकांनी जखमी सुनीताला रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता.

परिस्थितीचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी तातडीने आरोपीच्या शोधासाठी पथकं रावाना केली. पोलिसांनी एका तासात आरोपी विशालला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून विशालला हा देशी कट्टा कुठून आणला, त्याने कोणाकडून हा विकत घेतला का? याचा शोधही पोलीस घेत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x