पवारांवर टीका : शोधा आणि फोडा असा फतवा पक्षाने काढलेला नाही - अजित पवार

Ajit Pawar On Solapur NCP Students Congress Fatwa : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने काढलेला फतवा पक्षाने काढलेला नाही, पण बोलणाऱ्यांनी भान बाळगावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसावले आहे.  

Updated: May 15, 2022, 11:26 AM IST
पवारांवर टीका : शोधा आणि फोडा असा फतवा पक्षाने काढलेला नाही - अजित पवार title=

कोल्हापूर : Ajit Pawar On Solapur NCP Students Congress Fatwa : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने काढलेला फतवा पक्षाने काढलेला नाही, पण बोलणाऱ्यांनी भान बाळगावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसावले आहे. सोलापुरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने अजब फतवा काढला आहे. यापुढे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना शोधा आणि फोडा असा अजब फतवा काढण्यात आलाय. 

अभिनेत्री केतकी चितळे हिने पवारांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करणारी पोस्ट केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच खवळली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा आणि तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेससाठी त्यांनी आदेश काढला आहे. या आदेशात असं म्हटलंय की, जे शरद पवार आणि त्यांच्या परिवारावर खालच्या भाषेत टीका करतील अशा लोकांना शोधा आणि फोडा, अशी मोहीम सुरु करण्यात यावी असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी विनाश कालीन विपरीत बुद्धी, असे म्हणत अधिक बोलण्यास नकार दिला. त्याचवेळी ते म्हणालेत, समाजातील वातावरण बिघडणार नाही हे पाहिले पाहिजे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्टेटमेंट दिले नसते तर ते ते बोलत नाही, असे विरोधक म्हणाले असते. आता बोलले तर यांना लागलं. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही , महागाईचा मुद्दा आज महत्वाचा आहे , ऊस शिल्लक आहे तो संपवण्याकडे लक्ष देणे गरजेचे होते , प्राधान्य देणे आवश्यक आहे. हनुमान चालीसा , भोंगे , हिंदुत्व अशा मुद्दे पुढे आणणे हे चुकीचे आहे. 7 ते 10 यावेळेस अजान  याकडेही काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे, असे अजितदादा म्हणाले.