ठाणे : शहरात दहीहंडी उत्सवासाठी आलेल्या ठाणे-मुंबईतील गोंविदा पथक मानवी मनोरे उभारताना काही जण थरावरुन खाली पडल्याने ११ जण जखमी झाले आहेत. त्यात अकरा जण जायबंदी झाले असून त्यामध्ये एक तरुणीचा समावेश आहे. अकरा पैकी नऊ जण हे मुंबईतील जोगेश्वर आणि मालाड व मुलुंड येथील आहे.
जायबंदी झालेले गोंविदा हे नौपाडा,विष्णूनगर येथे थर लावता जखमी झाले आहे. मुलुंड येथील सुजय भेरेकर (२६), राहुल पेलान (२७), ठाणो आनंदनगर येथील कुणाल यादव (१०), मालाडची रकक्षा भगत (१९) आणि जोगेश्वरी येथील महेश धुरी (२४), योगेश देसाई (१९), संकल्प पवार (२१) विवेक कोचरेकर (३२) विपुल सिंग (२४) अविनाश वारिक (२३) तसेच ठाण्यातील सतीष जाधव (३५,ठाणे ) हे गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदाना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर दुसरीगडे रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुन खोत (२५) असे मृत गोविंदाचे नाव आहे. म्हसळा तालुक्यातील खरसई गावात ही घटना घडली. तर ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावण्याच्या विक्रमाची यंदाही जय जवान पथकानं बरोबरी केली.