प्रफुल्ल पवार,झी मीडिया, रायगड : बाळुमामाच्या(Balumama) दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. पेण खोपोली मार्गावर भीषण अपघात झाला आहे (Danger accident on Pen Khopoli road). या अपघातात दोन महिलांसह एकूण तीघेजण ठार झाले आहेत. तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे एक खळबळ उडाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पेण खोपोली मार्गावर वाकृळ फाटा येथे हा अपघात झाला आहे. कारने ट्रेलरला धडक दिल्याना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन महिलांसह तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पेण येथील म्हात्रे हॉस्पिटल तसेच कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कार मधील सर्व अपघातग्रस्त प्रवासी पेण तालुक्यातील सावरसई गावचे रहिवासी आहेत. हे सर्व जण बाळुमामाच्या दर्शनासाठी कोल्हापूरला निघाले होते. गावातून निघाल्यावर अवघ्या चार किलोमिटर अंतरावरच हा अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून मृत आणि जखमींना बाहेर काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.
श्री संत बाळूमामा यांचे समाधी स्थान आदमापूर नावाच्या खेड्यात आहे. कोल्हापूर शहर ते आदमापूर हे अंतर 50 कि.मी. आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, कोकण आणि राज्यातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. हजारो भाविक येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी येत असतात. संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. त्यांना लोक बाळूमामा म्हणून ओळखतात.