कोल्हापूर : कोल्हापूरात गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर तब्बल वीसहून अधिक धोकादायक इमारती आहेत. त्यामुळं गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यानं दुर्घटना घडू शकते.
कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांनी या धोकादायक इमारतीत रहाणा-या नागरीकांना या इमारती मोकळ्या कराव्यात असा आदेशही बजावला आहे.
मात्र, इमारतीमधील नागरिक काही केल्या इमारती मोकळ्या करायला तयार नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेनं गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतीवर नोटीस लावून या इमारतीखाली नागरीकांनी उभं राहू नये असं आवाहन केलं आहे.