'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशारा

Dhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.

सौरभ तळेकर | Updated: Apr 14, 2024, 10:50 PM IST
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशारा title=
Dhairyashil Mohite Patil direct warning to Ram Satpute

Madha loksabha election 2024 :  पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण वळवण्याची ताकद असलेला माढा लोकसभा मतदारसंघ (madha loksabha election) आता राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात असलेली काँग्रेसमधील दुसरी फळी पुन्हा आपल्याकडे वळून घेण्याचे प्रयत्न शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून केला जातोय. अशातच पश्मिच महाराष्ट्रातील केंद्रस्थान असलेल्या माढ्यात आता मोहिते पाटील कुटूंबियांना शरद पवारांनी हाताशी धरलंय. वाढत्या असंतोषाचा फायदा घेत शरद पवारांनी चालाख खेळी केली अन् माढ्याचं राजकीय समीकरण फिरवलं. धर्यशील मोहित पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी भाजपला नारळ दिला अन् राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना मोहिते पाटलांनी थेट राम सातपुते (Ram Satpute) यांना तंबी दिली आहे. तुला एका रात्रीत आमदार केला. एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायची ताकत आहे, असा थेट इशारा मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना दिल्याने आता माढ्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. 

नेमकं काय म्हणाले धर्यशील मोहिते पाटील?

मला फक्त आज इथं एका माणसाला उत्तर देयचंय. आपण त्याला इथून निवडून दिलं. त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला. मांडव्यात म्हटला 70 -75 वर्षात काय विकास केला? त्यांनी जे काम केलं, ते मी अडीच वर्षात केलं. मी फक्त एकच उत्तर देतो. दादांच्या सांगण्यावरून एका रात्रीत तुला आमदार केला. तुला एकच सांगतो. एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायची ताकद आमच्यात हाय, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना थेट इशारा दिला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदमध्ये आपण सत्ता आणून दिली. कायदेशीर कारवाईला समोर गेलो. खासदार निधी काय असतो हे विजयसिंह खासदार असताना त्यांनी दाखवून दिलं. आज दोन्ही पालखी मार्ग, सातारा पंढरपूर, पंढरपूर लातूर मार्ग विजयसिंह मोहिते खासदार असताना सुरुवात झाली. लाख मते ज्यांना आम्ही दिले, त्यांनी आम्हाला कोणत्याही बैठकीला बोलवले नाही. विरोधी आमदार घेऊन नीरा देवघर कालवा बैठकीला घेऊन गेले, अशी टीका धर्यशील मोहिते पाटलांनी केली आहे.

दरम्यान, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना मोहिते पाटलांनी साथ दिली अन् राम यांचं आमदार व्हायचं स्वप्न पूर्ण झालं. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून राम सातपुते यांचं नाव घेतलं जातं. माळशिरसमधून फडणवीसांनी राम सातपुते यांचं नाव पुढं केल्याने मोहिते पाटलांनी साथ देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, राम सातपुते यांच्यामुळे आता आपल्या गडाला तडा जाण्याचा धोका मोहिते पाटलांना वाटू लागलाय. त्यामुळे आता माढ्यात कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.