धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया : वेदांतने नऊ तासांत केले पार

वाशी  येथील वेदांत सावंत या अवघ्या 12 वर्षांच्या जलतरणपटूने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी अंतर 9 तास १८ मिनिटांमध्ये पोहून पार केले. 

Updated: Jan 25, 2019, 08:04 PM IST
धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया : वेदांतने नऊ तासांत केले पार   title=

नवी मुंबई : वाशी येथील वेदांत सावंत या अवघ्या 12 वर्षांच्या जलतरणपटूनं अलिबाग जवळील धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी 36 किमीचे अंतर 9 तास १८ मिनिटांमध्ये पोहून पार केले. रात्री 2 वाजता त्यानं धरमतर येथून पोहोण्यास सुरुवात केली होती. सकाळी 11 वाजून 18 मिनिटांनी तो गेट वे ऑफ इंडिया इथे पोहोचला. 

पहाटेची बोचरी थंडी आणि वेगाचे वारे अशी प्रतिकूल हवामान असतानाही वेदांतने हे अंतर पार केले. यापूर्वी त्यानं बांग्लादेश ते म्यानमार दरम्यानची 16 किमीची बांगला खाडी 4 तासांत पोहून पार केली आहे. ही खाडी पोहोणारा तो सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे. एलिफंटा ते गेटवे हे 14 किमी अंतरही त्यानं 2 तास 50 मिनिटांत पूर्ण केले होते.