राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू

राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे.  

Updated: Jan 25, 2019, 06:35 PM IST
राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू

नागपूर : राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. राज्यावर स्वाईन फ्लूचे पुन्हा एकदा संकट आले आहे. गेल्या २२ दिवसांत २६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. देशभरात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला आहे. स्वाईन फ्लूने देशात आतापर्यंत ७७ बळी घेतले आहेत. राज्यातल्या पुणे आणि नागपूर शहरांमध्येही स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे.

पुण्यातही रुग्ण आढळलेत

पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यातल्या पुणे आणि नागपूर शहरात स्वाईन फ्लूचे रूग्ण झपाट्यानं वाढू लागलेत. बदलत्या हवामानामुळे स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. पुणे नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचे २६२ रूग्ण आढळते. तर आतापर्यंत ८ जणांचा स्वाईन फ्लूनं बळी घेतलाय. देशभरात स्वाईनचे अडीच हजार रूग्ण आढळले असून ७७ जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय. राजस्थानात स्वाईन फ्लूचे जवळपास दीड हजार रुग्ण आढळलेत. राज्याच्या आरोग्य विभागानं विशेष खबरदारी घेतली आहे.

 स्वाईन फ्लूची कधी होते बाधा?

- अति ऊन आणि अति थंडी अशा मिश्र वातावरणात स्वाईन फ्लू वेगानं पसरतो 
- सर्दी, खोकला, ताप ही प्राथमिक लक्षणं 
- स्वाईन फ्लू वर उपयुक्त टेमी फ्लू हे औषध सर्वत्र उपलब्ध   
- गंभीर आजार असणाऱ्यांनी स्वाईन फ्लूची लस घ्यावी 
- स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार 
- स्वाईन फ्लूची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणं आवश्यक

सर्दी , खोकला, ताप ही स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणं आहेत. ती दिसू लागताच योग्य उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गर्भवती महिला, दमा,  मधुमेह, कर्करोग तसेच एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना स्वाईन फ्लूचा धोका अधिक संभवतो. अशा रुग्णांनी वर्षातून एकदा स्वाईन फ्लूची लस घेणे गरजेचे असल्याचंही डॉक्टरांनी म्हटले आहे. तापमानातील अनपेक्षीत बदल हे स्वाईन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक वातावरण आहे. अशा वेळी या विषाणूंची लागण होऊ नये, याची काळजी घेण्याचा सल्ला पुण्यातील डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे.

स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यापैकी नागपूर शहरातील ४ तर अमरावती जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जानेवारी महिन्याच्या २३ दिवसात स्वाईन फ्ल्यू मुळे हे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या २३ दिवसात नागपूर विभागात स्वाईन फ्ल्यू आजाराच्या २९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. नागरिकांनी देखील सर्दी, खोकला, ताप यासरखे आजर झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे नागपूर आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ संजय जायस्वाल यांनी केले आहे.  

नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झालेले रुग्ण - 

 - प्रफुल्ल मेंढे (३०, नागपूर)
- प्रभाकर कोहळे ( ५७, नागपूर )
- छायानिका भालोटिया (२७, नागपूर )
- सुधाकर कोहळे ( ६०,कामठी, नागपूर)
- संगीता वाघ (५२, अमरावती )