सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर डिझेल टँकर पलटी; वाहतूक खोळंबली

 डिझेलचा टँकर पलटी झाल्याने आग लागण्याची शक्यता असल्याने घटनास्थळी किसनवीर कारखान्याने अग्निशमन दल पाठवले

Updated: Apr 24, 2018, 07:14 PM IST
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर डिझेल टँकर पलटी; वाहतूक खोळंबली title=

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर डिझेल टँकर पलटी झाला. वाई तालुक्यातील पाचवड इथे सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. पाचवड जवळच्या रस्ता दुभाजकाला धडकून या टॅंकरचा अपघात झाला. या घटनेत कोणीही जीवीत हानी झाली नाही. तसेच, कोणी जखमी झाले नाही. मात्र टँकर मधून डिझेल गळती झाल्याने वाहतूक खोळंबली. तसेच, महामार्गावरची वाहतूक वाढे फाट्यामार्गे वळविली गेली.

रस्ता दुभाजकाला धडकून अपघात

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर डिझेल टॅन्कर पलटी पाचवड जवळील रस्ता दुभाजकाला धडकुन हा अपघात झाला.  या अपघातामुळे काही काळ वाहतूक  वाहतूक ठप्प झाली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पाचवड येथे उड्डाणपूल बंद असल्याने टँकर सर्व्हिस रोडवर वळवताना चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. त्यामुळे महामार्गावर डिझेल वाहू लागले होते. दरम्यान भुईंज पोलीस स्टेशनचे पीएसआय दुर्गानाथ साळी यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

किसनवीर कारखान्याने अग्निशमन दल पाठवले

टँकर पलटी झाल्याने वाहतूक येथील जोशी विहिरीपर्यंत ठप्प झाली होती. डिझेलचा टँकर पलटी झाल्याने आग लागण्याची शक्यता असल्याने घटनास्थळी किसनवीर कारखान्याने अग्निशमन दल पाठवले होते.