Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वैद्यकीय तपासणीची (Medical Examination) कागदपत्रं अखेर सापडली आहेत. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ही कागदपत्रं सापडली आहेत. यावर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणारे. त्यावेळी त्यांना ही कागदपत्रं सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिलीये. पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं. जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) आणि 2021मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं.
मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी खोटी कागदपत्र
वादग्रस्त आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकरने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीही नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केलं होतं अशी माहिती समोर आलीय. पूजा खेडकर यांनी 2007 मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी ऍडमिशन घेतलं होतं. यावेळी NT - 3 म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून ऍडमिशन घेतलं होतं. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असेल तरच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देण्यात येतं. मात्र त्यांनी मेडिकल प्रवेशासाठीही नॉन क्रिमीलेअरचा वापर केल्याचं स्पष्ट होतंय.
दरम्यान मेडिकल प्रवेशावेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागतं. काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकरांनी फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्यामध्ये त्यांनी कुठल्याच स्वरूपात दिव्यांग नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कॉलेज प्रवेशाच्या वेळी मात्र त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या अशी माहिती समोर आलीय.
अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न
दरम्यान, पूजा खेडकरांनी पुण्यातील जिल्हा रुग्णालयातून देखील अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता. शारीरिक दृष्ट्या विकलांग म्हणजेच कुठल्यातरी व्यंगाच्या कारणावरून हालचालींवर मर्यादा येत असल्याबाबतचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची 23 ऑगस्ट 2022 रोजी वैद्यकीय तपासणी झाली
त्यानंतर 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची विनंती फेटाळण्यात आल्याचं त्यांना औंध जिल्हा रुग्णालयाकडून लेखी कळवण्यात आलं.
खेडकर कुटुंबाचा शोध
पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खेडकर कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केलीत. पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोनही स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांचं म्हणणंय. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचं गेट बंद असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचं चित्रीकरण केलं.
पुण्यात भीक मांगो आंदोलन
पुण्यातील IASची ट्रेनिंग घेणारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांविरोधात भीकमांगो आंदोलन करण्यात आलंय.पानशेत परिसरातील शेतकरी आणि जागृत पुणेकरांनी हे आंदोलन केलंय. पिस्तुल रोखून हुसकवण्याची भाषा करणाऱ्या खेडकर कुटुंबियांविरोधात पैसे मागून भीकमागो आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आरोपींविरोधात चौकशी करण्यात यावी, अशी पुणेकरांकडून मागणी देखील करण्यात आलीय.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.