भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक

प्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांचे आज सांयकाळी नागपूरात हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या  त्यांच्या पार्थिवावर चंद्रपूरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Updated: Jun 3, 2022, 09:55 PM IST
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक title=

नागपुर -  प्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांचे आज सांयकाळी नागपूरात हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या  त्यांच्या पार्थिवावर चंद्रपूरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

सामाजिक श्रेत्रात योगदान 
चंद्रपुर विधानसभेतून भारतीय जन संघाच्यावतीने 1967 मध्ये सच्चिदानंदजी यांनी निवडणुक लढवली होती. यासह त्यांनी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख ,राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संघचालक, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष, चिन्मय मिशन अध्यक्ष अश्या विविध पदावर कार्यरत राहून सामाजिक श्रेत्रात मोलाचे योगदान दिले होते. 

देवेद्र फडणवीस यांनी ट्वीट करत व्यक्त केले दुख  
माझे सहकारी श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वडिल, रा. स्व. संघाचे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले.
सुधीरभाऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.

सच्चिदानंद यांच्या पश्चात त्यांची दोन मुले भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार आणि नेत्रतज्ज्ञ डॉ.संदीप मुनगंटीवार सुना, लेक, जावई, नांतवडे असा परिवार आहे.