मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले. प्रदेशाध्यक्ष म्हणून एकनाथ खडसेंचा राजीनामा माझ्याकडे आला. राजीनामा हातात पडेपर्यंत आम्ही आशावादी होतो, की नाथाभाऊ ही स्टेप घेणार नाहीत. पण त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला हे कटू सत्य असल्याचे पाटील म्हणाले.
एकनाथ खडसेंनी पक्षात राहाव, पक्षाच नेतृत्व कराव असं आम्हाला वाटतं होते. राजीनामा द्यायची वेळ का आली ? असा प्रश्न त्यांना विचारला असता या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांनी टाळलं. पक्षामध्ये त्यांचं स्थान आहे. पक्षामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला का ? जे जे घडल त्या प्रत्येकावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडलीय. त्यामुळे राजीनामा का दिला ते त्यांनाच विचाराव असे पाटील म्हणाले.
एखाद्याला काम दिलं की त्यांनी करण्याची पद्धत आहे. एकत्र बसू आणि सर्व विषय पुन्हा चर्चेला आणू असं मला वाटत होतं. प्रत्येक घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो. नाथाभाऊंनी जायला नको होतं. त्यांच्या जाण्याने पार्टीचं नुकसान होईल. त्यामुळे ते असं करणार नाहीत असं वाटलं होतं. पण तसं झालं नसल्याचे पाटील म्हणाले. आता चर्चांमध्ये काही अर्थ नाही.
खडसेंच्या राजीनाम्यानंतर पक्षात चर्चा होईल का ? या प्रश्नावर प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करण्याची आमच्याकडे पद्धत असल्याचे ते म्हणाले.