धुळे : स्फोट हा घातपात नाही तर कंपनीतला स्फोट हा अपघात आहे, अशी माहिती 'झी २४ तास'ला सूत्रांकडून देण्यात आली. धुळ्यातील शिरपूर शहराजवळ रुमित केमिकल नावाच्या रसायन बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे शिरपूर शहरासह आजूबाजूची गावे हादरली. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जण जखमी झालेत. मृतांमध्ये मुलांची संख्या अधिक आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. एनडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. रसायनाची गळती सुरू झाल्यामुळे आसपासच्या भागातल्या लोकांना दूर हटवण्याचं काम पोलीस यंत्रणा केलं. दरम्यान जखमी झालेल्यांना शिरपूरच्या उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी झालेल्यांना उलट्यांना त्रास होण्यास सुरूवात झाली आहे. जे लोक घटनास्थळी गेलेत त्यांनाही त्रास होत असल्याचं उघड झाले आहे.