Fact Check : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सुमित्रा महाजन यांची नियुक्ती?

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती?

Updated: Oct 31, 2022, 01:20 AM IST
Fact Check : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सुमित्रा महाजन यांची नियुक्ती?  title=

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhgatsingh Koshyari) यांना नारळ देत त्यांच्या जागी लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि इंदूरमधून (Indur) आठ वेळा खासदार राहिलेल्या सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी (Governor) नियुक्ती झाल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता. यावर सुमित्रा महाजन यांनी आपली प्रतिक्रिया देत या चर्चांणा पूर्णविराम दिला आहे.

मला याबद्दल कोणी विचारलं नाही, माहित नाही या गोष्टी कुठून आल्या आहेत, असं सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan) म्हणाल्या. त्यामुळे महाजन यांची स्वत:च महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. याआधीही महाजन यांना गोव्याचं राज्यपाल बनवल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

महाराष्ट्रातील अनेक जणांनी व्हाट्सअॅपला स्टेटस ठेवत त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेक जणांनी महाजन यांच्या छायाचित्राचा वापर करून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर पोस्ट केल्या आहेत. मात्र सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली नाही. सुमित्रा महाजन यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमध्ये झाला आहे. काही दिवसांनी त्यांचं कुटूंब मुंबईमध्ये स्थिरावलं त्यानंतर त्यांचा विवाह इंदूरचे अधिवक्ते जयंत महाजन यांच्याशी झाला होता.