टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

अगदी तीन ते चार रुपये किलो भाव टोमॅटोला मिळत आहे. 

Updated: Sep 16, 2019, 12:37 PM IST
टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ title=

औरंगाबाद : एकीकडे मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळात खचला आहे. त्यात काही ठिकाणी पीकं आली मात्र त्याला भाव नसल्यानं शेतकऱ्यांना पीकं रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द या गावात टोमॅटोचं चांगलं पीक आलं आहे. पण टोमॅटोचे भाव मात्र कोसळले आहे. अगदी तीन ते चार रुपये किलो टोमॅटोला मिळत आहे. 

त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची वाहतूक करणंही परवडत नाही. जेवढा खर्च त्यांच्या उत्पादनाला लागला तेवढा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. तर काही ठिकाणी जनावरांना खायला देण्यात येत आहेत. पाऊस सुरू असल्यानं दूरपर्यंत टोमॅटोची वाहतूक सुद्धा करता येत नाही. 

त्याचाही फटका बसत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या मेटल्स आणि मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशकडून (एमएमटीसी) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला होता. 

यानंतर आता सरकारने या निर्णयापासून माघार घेतली आहे. संबंधित निविदेत बदल करण्यात आला असून पाकिस्तान वगळता इजिप्त, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा अन्य कोणत्याही देशामधून कांदा आयात करता येईल, असे सुधारित निविदेत म्हटले आहे.