साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला गालबोट, कर्मचाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी

मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

Updated: Nov 16, 2021, 09:10 PM IST
साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला गालबोट, कर्मचाऱ्यांमध्येच जोरदार हाणामारी title=

सातारा : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अनेक एसट डेपो ओस पडले आहेत. अशात साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला गालबोट लागलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. 

एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एसटीचा संप सुरू असताना चालक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते. यावर इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा केली म्हणून किरकोळ बाचाबाची होऊन त्यांच्यात मारहाणीची घटना घडली आहे. या वादावादीत राजू पवार याने वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात चिडून दगड घातला. यात अमित चिकणे जखमी झाले.

यामुळे घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मारहाण करणाऱ्या चालकास पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं असून त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.