फिल्मी स्टाईलने चोरी, ATMसाठी आणलेली 23 लाखांची रोकड अशी लांबवली

एटीएममध्ये (ATM) पैसे भरण्यासाठी आणलेली 23 लाख रुपयांची रोकड लुटण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 

Updated: Oct 13, 2021, 09:13 AM IST
फिल्मी स्टाईलने चोरी, ATMसाठी आणलेली 23 लाखांची रोकड अशी लांबवली title=
संग्रहित छाया

सिंधुदुर्ग : एटीएममध्ये (ATM) पैसे भरण्यासाठी आणलेली 23 लाख रुपयांची रोकड लुटण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. जिल्ह्यात वैभववाडी येथे ही घटना घडली असून दिवसाढवळ्या ही चोरी झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. (Film style theft at Vaibhavwadi in Sindhudurg, 23 lakh cash brought for ATM)

ATM मधून पैसे काढताना सावधान, चक्क ...

वैभववाडीमधील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी येत असताना असलेली तब्बल 23 लाख रुपयांची रोकड लुटण्याची घटना काल भरदुपारी तळेरे वैभववाडी रस्त्यावर घंगाळेवाडी येथे घडली. बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये कॅश डिपॉझिट करणारे सेक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनीचे कर्मचारी विठ्ठल खरात (वेंगुर्ले), सगुण केरवडेकर (कुडाळ) हे मोटरसायकलवरुन 23 लाख रुपये कॅश वैभववाडी येथील बँक एटीएम मध्ये डिपॉझिट करण्यासाठी कणकवलीतुन वैभववाडीच्या दिशेने येत होते. 

कणकवलीच्या बँक ऑफ इंडियामधून 30 लाखाची रोकड खरात आणि केरवडेकर यांनी ताब्यात घेतली आणि त्यातील 7 लाख रुपये कणकवलीच्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये डिपॉझिट केले. त्यानंतर उर्वरीत 23 लाख रुपये वैभववाडी येथील एटीएममध्ये भरणा करण्यासाठी मोटरसायकलने येत असताना कोकीसरे घंगाळेवाडी येथे मागून मोटरसायकलने आलेल्या तिघांनी खरात आणि केरवडेकर यांच्या मोटारसायकलवर लाथ मारली. तसेच दोघांच्याही डोळ्यांत मसाला पावडर मारली आणि त्यांच्या ताब्यातील रोख 23 लाख रुपये घेऊन तळेरेच्या दिशेने पोबारा केला.

हा प्रकार काल दुपारी पावणेतीन वाजण्याच्या दरम्यान घडला. दि. 12 ऑक्टोबर रोजी भरदुपारी रस्त्यावर झालेल्या 23 लाख रोकडीच्या चोरीने खळबळ माजली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची कारवाई वैभववाडी पोलीस ठाण्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.