मुंबई : उरण येथील ओएनजीसी गॅस प्लांटमध्ये सकाळी मोठी आग लागली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव एक किलोमीटरच्या परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. लागलेल्या आगीत तीन कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निमन दलाचे सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीत जखमी झालेल्या तीन कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेऊन येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येत आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव एक किलोमीटर परिसरात येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.
Maharashtra: Fire breaks out at a cold storage at Oil and Natural Gas Corporation (ONGC) plant in Uran, Navi Mumbai. Fire tenders have reached the spot. pic.twitter.com/V2HSCt58nJ
— ANI (@ANI) September 3, 2019
ही आग कशामुळे लागली याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच सोमवारीही आगची घटना घडली होती. उरण येथील बामर लॉरी गोदामातील कपड्याने भरलेल्या कंटेनरला आग लागली होती. कंटेनरमधील माल जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले होते.