पुण्यातल्या एसव्हीएस कंपनीला लागलेल्या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू

 पुण्यातल्या उरवडे जवळ एसव्हीएस कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू

Updated: Jun 7, 2021, 09:17 PM IST
पुण्यातल्या एसव्हीएस कंपनीला लागलेल्या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू  title=

पुणे : पुण्यातल्या उरवडे जवळ कंपनीला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झालाय. यात महिलांचा समावेश अधिक आहे.  दुपारच्या सुमारास एसव्हीएस या केमिकल कंपनीला भीषण आग लागली. त्यावेळी कंपनीत 40 कामगार होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय. 

आग लागल्याचं समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. याठिकाणी जवळपास 15 ते 20 कामगार अडकले होते. त्यातील 18 जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुळशी तालुक्यातील लावासा रोडवर उरवडे गावाच्या जवळ SVS aqua technologies कंपनीला आग लागली होती. आग लागल्याचं कळताच तहसीलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे त्या कंपनीच्या परिसरात पोचलेले होते. 

आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर चालू झाले. आतमध्ये अडकलेल्या काही मजुरांना वाचविण्यात यश आले. आगीमुळे परिसरामध्ये प्रचंड धुराचे लोट निघत होते. चार किलोमीटर पर्यंत हे धुराचे लोट दिसत होते

बातमीचा व्हिडिओ

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x