Omicrone | राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची मालिका सुरुच, आता या जिल्ह्यात आढळला रुग्ण

नागपूरपाठोपाठ आणखी एक जिल्ह्यात ओमायक्रोनचा आढळला रुग्ण 

Updated: Dec 15, 2021, 05:58 PM IST
Omicrone | राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची मालिका सुरुच, आता या जिल्ह्यात आढळला रुग्ण  title=

मयुर निकम, झी 24 तास, बुलढाणा : नागपूर पाठोपाठ आता आणखी एक जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि आता आणखी एक जिल्ह्यात ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी दुबईवरून परतलेल्या एका 65 वर्षीय इसमास ओमायक्रॉन ची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

दुबईवरून परतल्यानंतर अगोदर या व्यक्तीची RTPCR चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ही व्यक्ती पॉझिटीव्ह आल्यानंतर सध्या नव्याने आलेल्या ओमायक्रोनची चाचणी करण्यासाठी या रुग्णाचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले होते. 

बुलढाण्यात हा ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. 65 वर्षांच्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली की नाही ते पाहण्यासाठी चाचणी करण्यात आली. पुण्यावरून रिपोर्ट आल्यानंतर ही चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले सर्वजण निगेटिव्ह असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही फक्त स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत बुलढाण्याचे तहसीलदार यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. 

बुलढाण्यात पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्याने आता प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आणि कोरोना विरुद्ध तयार करण्यात आलेल्या नियमावलीचं कठोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.