पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्ससह छेडछाड; माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्ससह छेडछाड करणे माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला चांगलेच महागात पडले आहे. नितीन राऊत यांचे सपुत्र कुणाल राऊत यांना अटक झाली आहे.  

Updated: Feb 4, 2024, 10:13 PM IST
पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्ससह छेडछाड; माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक title=

Kunal Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्सची  खोडतो केल्या प्रकरणी नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली आहे.  कुणाल राऊत हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत. या कारावाईमुळे एकच खळबळ उडाली. 

कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन "मोदी की गॅरंटी" अशा आशयाच्या पोस्टर्स वर काळे फासले होते. तसेच मोदी या शब्दावर दुसरे स्टिकर्स लावून पोस्टर्सची खोडतोड केली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आज कुणाल राऊत यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले होते. मात्र कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच बेपत्ता होते. नागपूर जिल्ह्यातील कुही मधून रविवारी सायंकाळी  नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मोदी गॅरंटी आता नेमकी कुणाला पावणार? उद्धव ठाकरेंचा सवाल

भाजप आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींना खोचक टोले लगावले. गायकवाडला गोळीबार करायला भाग पाडणा-या मिधेंना अटक होणार का, त्यांचा राजीनामा घेणार का, असा सवाल ठाकरेंनी केला. मोदी गॅरंटी आता नेमकी कुणाला पावणार, अशी विचारणाही त्यांनी सावंतवाडीतल्या सभेत केली. तर सरकारमध्ये गँगवॉर सुरू झालंय, अशी टीका कुडाळमधल्या सभेत केली. 

मोदींची गॅरंटी काही खरी नाही - शरद पवार 

मोदींची गॅरंटी काही खरी नाही, याचा अनुभव अनेकवेळा आलाय, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. तसंच अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही, मग लोकसभा निवडणुकीत हे ४०० जागा कशा काय येणार, असा सवालही पवारांनी केलाय. शरद पवारांनी शिर्डीमध्ये राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं. 

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुंबईचा मुफ्ती सलमान अजहरी याला गुजरात एटीएसकडून अटक

गुजरातच्या जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुंबईचा मुफ्ती सलमान अजहरी याला गुजरात एटीएसनं अटक केलीय.. मुंबईतील घाटकोपर भागातून मुफ्ती अजहरीला गुजरात पोलिसांनी अटक केली. गेल्या 31 जानेवारी रोजी मुफ्तीनं गुजरातमध्ये प्रक्षोभक भाषण केलं होतं. याप्रकरणी भादंविच्या कलम १५३ ब नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान, मुफ्तीला अटक केल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जोरदार राडा झाला. या कारवाईला विरोध करण्यासाठी मुस्लीम समाजाचे लोक मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्याबाहेर जमले होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x