मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात चार पर्यटक बुडाले; कोल्हापुरहून आले होते सहलीसाठी

 तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर सहलासाठी आलेले चार पर्यटक समुद्रात बुडाले आहेत. 

Updated: Nov 10, 2023, 06:27 PM IST
मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात चार पर्यटक बुडाले; कोल्हापुरहून आले होते सहलीसाठी  title=

sindhudurg tarkarli beach : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर सहलासाठी आलेल्या पर्यटांसह एक विचित्र प्रकार घडला. यमुद्राचा आनंद लुटत असताना तारकर्ली समुद्रात चार पर्यटक बुडाले आहे. हे सर्व जण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. 

कोल्हापूर तालुक्यातील मुरगुड येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सहल तारकर्ली येथे आली होती. समुद्रात आंघोळीला गेले असता अंदाज न आल्याने 4 युवक बुडाले यातील तिघांना स्थानिकांनी वाचवले तर एकाचा शोध सुरू आहे.  येथे बचावकार्य सुरू आहे. ज्या तरुणांना वाचवण्यात यश आले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, 

भाजप आमदाराच्या भाचाचा तारकर्ली समुद्रात बुडून मृत्यू

सिंधुदुर्गच्या तारकर्लीत पर्यटकांची बोट बुडून दोघांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा भाचा आकाश याचाही समावेश आहे. तर जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे यांचाही समुद्रात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. अपघातातील दोन पर्यटकांवर रुग्णालयात उपचार करण्यात आला अन्य 16 जण सुखरूप आहेत.