प्रताप नाईक, झी मीडिया, सातारा : शेतातून घराकडे जात असतानाच मृत्यने गाठलं आहे. सातारा येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पडून या अपघात झालाय. या अपघातात एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे.
साता-यात ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटली यात चार महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर 1 महिला गंभीर जखमी आहे. कारंडवाडी इथली ही घटना आहे. शेतातील कामं पूर्ण करून घराकडे जात असताना हा अपघात झाला. कॅनॉल रस्ता अरुंद असल्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या घटनेमुळे कारंडवाडी गावावर शोककळा पसरली. अरुणा शंकर साळुंखे (वय 58 वर्षे), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60 वर्षे), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65 वर्षे) आणि उल्का भरत माने (वय 55 वर्षे) असी मृत महिलांची नावे आहेत.
पंढरी वारीत रस्ता सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी वारक-यांना विशेष सूचना
पंढरी वारीत रस्ता सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी वारक-यांनी उजव्या बाजूने चालण्याचं आवाहन आरटीओनं केले आहे. त्यासाठी परिवहन विभागाची 15 पथकं प्रबोधन करत आहेत. तसेच वारक-यांनी इतरांनाही हे नियम सांगावेत असं आवाहन केले आहे. यासाठी वारक-यांना परिवहन विभागानं देवदूत हा टॅग आणि वाहतूक सुरक्षेचा हँडबँडही दिला आहे.
भंडा-यात बस डिव्हाडरला धडक्यानं अपघात झाला आहे. दुचाकीस्वारांना वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यात बसचालक जखमी झाला. गोंदिया शहरातील भूमिगत गटार योजना नागरिकांच्या जीवावर उठतेय. गटाराचं काम धिम्यागतीनं सुरू आहे. यात 12 जणांचा अपघात झाला.
नाशकात एसटी बस आणि सिमेंट मिक्सरची धडक झाली. या अपघातात 15 जण जखमी झालेत. या अपघातानंतर 2 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. नाशिकच्या पेठ रोडवर पुणे-नाशिक पेठबसला सिमेंट मिक्सरच्या वाहनाची धडक बसली. या अपघातानंतर गुजरात पेठकडे जाणारी शेकडो वाहनं रस्त्यातच खोळंबली होती.
जेएनपीटी पनवेल मार्गावर शनिवारी झालेल्या कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरलीये. यात अजून दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात पिकअप व्हॅन कंटेनर खाली अडकून अपघात झाला. अपघातात पिकअपमधील तिघेजण जखमी झाले.दोन जखमींना आधी बाहेर काढण्यात आले. नंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करून पिकअपमध्ये अडकलेल्या एका जखमीला बाहेर काढण्यात आले.