Gajendra Buffalo | बघताय काय रागानं, कृषी मेळाव्यात 80 लाख किंमत मिळवलीये रेड्यानं

गजेंद्र नावाचा (Gajendra Buffalo) रेडा हा या कृषी मेळाव्याचा (Sangli Farmer Exibition) आकर्षणाचा मुद्दा ठरलाय. या रेड्याची ठरलेली किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.   

Updated: Dec 20, 2021, 04:15 PM IST
Gajendra Buffalo | बघताय काय रागानं, कृषी मेळाव्यात 80 लाख किंमत मिळवलीये रेड्यानं title=

सांगली : राज्यात दरवर्षी विविध जिल्ह्यात कृषी मेळाव्यांचं (Sangli Farmer Exhibition) विविध संघटना तसेच राजकीय पक्षांकडून आयोजन करण्यात येत. या मेळाव्यात अनेक कोटींची आर्थिक उलाढाळ होते. दरवर्षी या अशा कृषी मेळाव्यांमध्ये हमखासपणे एखादा रेडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. यंदाही हा असाच रेडा हा या कृषी मेळाव्याचा आकर्षणाचा मुद्दा ठरलाय. या रेड्याची ठरलेली किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. (Gajendra Buffalo from Mangsuli village on the Maharashtra Karnataka border at the Swabhimani Shetkari Sanghatana farmer exibition in Sangli Rate Rs 80 lakh ruppes)

सांगलीत स्वाभिमानी संघटनेतर्फे (Swabhimani Shetkari Sanghatana) कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात मुऱ्हा जातीचा रेडा (Murrah Buffalo) भाव खावून गेलाय. या रेड्याचं गजेंद्र (Gajendra Buffalo) असं नाव ठेवण्यात आलं आहे. या रेड्याचं वजन 1 हजार 600 टन इतकं आहे. हा रेडा महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील मांगसुली (Gajendra Buffalo Mangsuli)  गावातला आहे.  

या अशा आंडदांड रेड्याची किंमत 80 लाख ठरवण्यात आली आहे. या रेड्याला पाहण्यासाठी अनेक जण 100 किमीपेक्षा दूरच्या अंतराने येत आहेत. एखाद्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहते गर्दी करत नाहीत, त्यापेक्षा अधिक प्रमाणात या रेड्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. 

रेड्याची किंमत 80 लाख मात्र....

या रेड्याला खरेदी करण्यासाठी अनेकांनी इच्छा दर्शवली. मात्र इच्छा असून चालत नाही, खिशात पैसाही हवाच. या रेड्याला एकाने गडगंज व्यक्तीने खरेदी करण्याची तयारी दर्शवली. व्यवहार ठरला. किंमत चक्क 80 लाख. मात्र यानंतरही या रेड्याच्या मालकाने रेडा विकण्यास नकार दिला. 

हाय मेंटेनंस रेडा 

या रेड्याची ठरलेली किंमत पाहून तुम्ही अवाक झाला असाल, पण थांबा. या रेड्याचा दररोजचा खुराकही त्याच्या सारखाच तगडा आणि मजबूत आहे.  

"गजेंद्रला  दररोज 15 लीटर दूध, उस आणि अन्य पदार्थ लागतात. हा रेडा अवघ्या 4 वर्षांचा आहे. या रेड्याची अगदी लहान मुलाप्रमाणे जपणूक करावी लागते", अशी माहिती त्याच्या मालकाने दिली.