गेल्या ३८ वर्षांपासून मशिदीत गणपती बाप्पांचं आगमन

हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक

Updated: Sep 14, 2018, 02:07 PM IST
गेल्या ३८ वर्षांपासून मशिदीत गणपती बाप्पांचं आगमन title=

सांगली : सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी हे गाव हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे. या गावात दोन्ही समुदायाचे लोक मशिदीत गणपती बसवतात. गेल्या ३८ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यावर्षी गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आला आहे. न्यू गणेश तरूण मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. हिंदूंसह मुस्लीम बांधवही उत्साहात गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करतात. गणेशाच्या आरतीच्या वेळेस दोन्ही समुदायाचे नागरिक सहभागी होतात. यावर्षी वाळव्याचे प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या हस्ते आरती करून गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.

गणेशोत्सवामुळे नाही दिली बकऱ्याची कुर्बानी

हिंदू आणि मुस्लीम ऐक्याच प्रतीक असलेल्या न्यू गणेश तरुण मंडळाच्या या गणेशोत्सवाच सर्वत्र कौतूक होत आहे. धार्मिक आणि सामाजिक उपक्रम या मंडळामार्फत राबावले जात आहेत. मागच्या वर्षी गणपती आणि बकरी ईद एकत्र साजरा करण्यात आला. मुस्लीम बांधवांनी नमाज पठण करून ईद साजरी केली. पण गणेशोत्सव असल्यामुळे बकऱ्याची कुर्बानी दिली नव्हती. गणेशविसर्जन झाल्यावर बकरी ईद साजरा केला.

पाहा बातमीचा व्हिडिओ