कल्याणमध्ये मंडप व्यवसायांच्या नावाखाली सुरु होता गांजा व्यवसाय

गांजा विक्रीचा धंदा करणाऱ्या दोघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या 

Updated: Dec 6, 2020, 07:26 PM IST
कल्याणमध्ये मंडप व्यवसायांच्या नावाखाली सुरु होता गांजा व्यवसाय title=

आतिष भोईर, कल्याण : मंडप व्यवसायाच्या आड गांजा विक्रीचा धंदा करणाऱ्या दोघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहसीन पठाण व बाबा उस्मान शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून कल्याण बाजारपेठ पोलिसांनी दहा किलो गांजा जप्त केला आहे.

कल्याण पश्चिमेतील मदार छल्ला परिसरात राहणाऱ्या मोहसीन पठाण हा मंडपाचा व्यवसाय करत होता. मात्र या व्यवसायाच्या आडून तो गांजा विक्री करत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक पठाणच्या मागावर होते. या पथकाने मोहसिनच्या घरावर छापा टाकत मोहसीन याला गांजा भरत असताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून दहा किलो गांजा जप्त केला. 

मोहसीन विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखलं करत अधिक चौकशी केली असता त्याला आंबिवलीतील बाबा उस्मान शेख याने गांजा पूर्वल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तत्काळ बाबा शेखलाही अटक केली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी दिली आहे.