गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?

अहमदनगर जिल्हा न्यायालयात आज आदेशानुसार गौतमी पाटील हजर राहिली. अटी-शर्तींच्या आधारावर गौतमीला जामीन मंजूर केला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 19, 2024, 08:17 PM IST
गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?  title=

आपल्या हटके डान्समुळे लोकप्रिय असलेली डान्सर गौतमी पाटील आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. यावेळी गौतमी पाटील कोणत्या कार्यक्रमात नाही तर चेहऱ्याला स्कार्फ आणि अतिशय साध्या ड्रेसमध्ये चक्क न्यायालयात दिसली. रंगीत साड्या घालून कार्यक्रम गाजवणारी गौतमी पाटील अहमदनगरच्या न्यायालयात दिसली. पण यामागचं नेमकं कारण काय? 

गौतमीला भोवलेलं प्रकरण कोणतं? 

अहमदनगरमध्ये 2023 मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. हाच कार्यक्रम गौतमीला भारी पडला आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गौतमी पाटील न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणं अनिवार्य होतं. अन्यथा तिच्यासाठी वॉरंटदेखील निघू शकलं असतं. असं असताना आज शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागलंच. न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.

गौतमीला ओळखणं झालं कठीण? 

रंगीबेरंगी साड्या, लक्षवेधी हावभाव असा गौतमी पाटीलचा कार्यक्रमात लूक असतो. पण अहमदनगरच्या न्यायालयात हजर राहिलेल्या गौतमी पाटीलला ओळखणं मात्र कठीण झालं होतं. कारण यावेळी गौतमी पाटील चेहऱ्याला स्कार्फ बांधून अतिशय साधा ड्रेस घालून न्यायालयात हजर झाली होती. अशा अवस्थेत गौतमी पाटीलला ओळखणं देखील कठीण झालं होतं.

2023 चं प्रकरण? 

गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांनी विनापरवानगी कार्यक्रम घेत नियमांचं उल्लंघन केलं होतं. या संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने अटी आणि शर्तींनुसार जामीन मंजूर केला आहे.

विमानात नारळ घेऊन जाण्यास मनाई, कारण हैराण करणार 

फ्लाइटमध्ये