कोल्हापूर : विदेशी पर्यटक वैविधतेने परिपूर्ण असलेल्या भारताचे दर्शन घेण्यासाठी नेहमीच उत्सूक असतात. आता या पर्यटकांचा कल ग्रामीण भागातही वळत आहे. जर्मनीची विद्यार्थीनी तरेसा कोल्हापुरातले आपत्ती व्यवस्थापन कसे चालते हे जाणून घेण्यासाठी आली आहे. तिने कोल्हापुरविषयी ऐकले, जाणून घेतले आणि ती चक्क कोल्हापुरच्या प्रेमातच पडली. जर्मनीतल्या तरुणीला रांगड्या राकट कोल्हापूरने भुरळ घातली आहे.
तेरेसा ही खास जर्मनीहून कोल्हापूरला आली आहे. राकट, कणखर पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन कसे चालते. हे पाहण्यासाठी ती कोल्हापुरात दाखल झाली आहे. जर्मनीमध्ये झालेल्या एका परिषदेत तिला यासंदर्भातली माहिती मिळाली. मग तिच्यासाठी खास आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली.
जर्मनची विद्यार्थिनी तरेसा म्हणते, 'कोल्हापूर हा भौगोलिक दृष्ट्या दरी खोऱ्यांचा परिसर आहे. या भागात दरवर्षी पूरस्थिती असते.अशा परिस्थितीत कशा प्रकारे सावधानतेने काम केले जाते. त्याची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.'
अपत्ती व्यवस्थापनेचे काम अगदी खालच्या पातळीवर कशा प्रकारे करण्यात येते त्याची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. दोन दिवस हे काम चालू होते. अशी प्रतिक्रिया आपत्ती व्यस्थापन अधिकारी साद संकपाळ यांनी दिली. आता तेरेसा या जर्मनीमधल्या एका विद्यापीठात या आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात पीएचडीसाठी प्रबंध सादर करणार आहेत.