उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्या

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे भाव जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 17, 2024, 12:10 PM IST
उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्या  title=
Gold silver price fall today check 22 and 24 carat price maharashtra

Gold Price Today: मागील आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाली होती. मात्र, आज मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. सोनं आणि चांदी दोन्ही वायदे बाजारा घट झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 74,890 वर स्थिरावली आहे. चांदीच्या दरातही 160 रुपयांची घसरण झाली असून 89,446 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली आहे. काल चांदी 89,609 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता. 

सराफा बाजारात सोनं आज 74,890 रुपये आहे प्रतितोळा आहे. तर, चांदी 87400 रुपये प्रति किलोग्रॅमच्या आसपास आहे. तर. चांदीचा शिक्का 950 रुपये प्रति नग असा दर सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यूएस फेडच्या मिटिंगच्या आधी गुंतवणुकदार थोड सतर्क झाल्याचे पाहायला मिळतेय. मात्र, काल मौल्यवान धातुने 2590 डॉलरचा दर गाठला होता. चांदी 2 महिन्याच्या उच्चांकी दरावर म्हणजेच 31 डॉलरच्या वर व्यवहार सुरू आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव $2,581.68 प्रति औंस होता. यूएस सोन्याचे वायदे देखील सुमारे $2,608.60 होते. फेडरेशनच्या बैठकीच्या संदर्भात, 66% तज्ञांना अपेक्षा आहे की 50 बेस पॉइंट्सची कपात केली जाऊ शकते.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  68,650 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  74,890 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  56,170 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,865 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 489 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 617 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   55, 040 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   60, 040 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    45, 032 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 68,650 रुपये
24 कॅरेट- 74,890 रुपये
18 कॅरेट- 56,170 रुपये