प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड आज कोल्हापूरात
प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड आज कोल्हापूरात
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड आज कोल्हापुरात येणार आहे.
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड आज कोल्हापुरात येणार आहे.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडवीलकर विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कोल्हापुरात एक दिवस येऊ द्यावं, अशी मागणी प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाडनं केली होती. यासाठी त्याने कोल्हापूर सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या विनंती अर्जाला न्यायालयानं मंजूरी दिलीय. त्याला 11 ते 5 या वेळेत कोल्हापूरात येण्याला परवानगी देण्यात आल्याची माहिती त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी दिलीय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात प्रारंभी विकास खंडेलवाल व मनीष नागोरे यांना अटक करून संबंधित तपास अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल केली का? की कारवाईचा केवळ दिखाऊपणा केला? तसे असेल तर अशा संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाणार? असे गंभीर प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय व महाराष्ट्र पोलिस दल प्रमुखांपुढे उपस्थित केले आहेत. तसेच असे काही असल्यास न्यायालयात योग्य तो कृती अहवाल सादर केला जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.